मुंबई बंदरातील शतकपूर्ती कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा*भारतातील बंदर व गोदी उद्योगातील ३ मे १९२० रोजी मुंबई बंदरात स्थापन झालेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचा १०४ वा वर्धापन दिन ३ मे २०२३ रोजी माझगाव येथील कामगार सदन सभागृहात ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

याप्रसंगी ॲड.एस.के.शेट्ये यांनी वर्धापनदिनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की. संघटनेच्या चांगल्या कार्यामुळे आपली सभासद संख्या वाढत चालली आहे. हे श्रेय सर्व कामगार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी ८ ऑगस्ट 2023 रोजी स्व. डॉ. शांती पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोदी कामगारांचा कौटुंबिक मेळावा घेण्यात येईल. आज कामगार चळवळी समोर अनेक आव्हाने असून, त्याचा सामना करण्यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने राहण्याची गरज आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की. गोदी कामगारांना चांगली पगार वाढ, पेन्शन, आरोग्य सुविधा, कॅन्टीन सुविधा, कामगारांना प्रबोधन करण्यासाठी पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंक अशा अनेक कामगारहिताच्या योजना अमलात आणल्या आहेत. युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी शुभेच्छा देताना कामगार चळवळीची आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरच्या परिस्थितीचे विश्लेषण केले. कामगार सदन इमारतीच्या पुनर्विकासाबाबत सविस्तर माहिती दिली. युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी मुंबई बंदराची आर्थिक स्थिती, मुंबई बंदराला मिळणारे उत्पन्न व कामगार हिताचे घेतलेले निर्णय याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. कामगारांना ११ मे ला वेतन कराराच्या थकबाकीचा सहावा हप्ता मिळणार आहे. याप्रसंगी युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, सेक्रेटरी विजय रणदिवे, प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, उपाध्यक्ष शीला भगत, संघटक मनीष पाटील, कमिटी मेंबर योगिनी दुराफे यांची वर्धापन दिनावर आधारित मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेला युनियनचे पदाधिकारी, निसार युनूस, अहमद काझी, विकास नलावडे, शशिकांत बनसोडे, विष्णू पोळ, संदीप चिरफळे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेला कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आपला

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉग अँड जनरल युनियन

टिप्पण्या