राम दातीर माहूर ( प्रतिनिधी )माहूर शहरात पवनसूत हनुमान यांची जयंती भक्तीभावात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात जागोजागी महाप्रसादाचे ...
राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी )माहूर शहरात पवनसूत हनुमान यांची जयंती भक्तीभावात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक शासकीय विश्राम गृहाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रविंद्र उमाळे यांनी प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते,तसेच विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नंदकिशोर कोठे, शाखा अभियंता रापर्तीवार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, नगर पंचायत कर्मचाऱ्यांनीही महाप्रसादाची सोय केली होती. स्थानिक भक्तांसह पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

COMMENTS