मुंबईदि.१४:केवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यापेक्षा त्यांनी संविधानाच्या रुपाने दिलेल्या लोकशाहीचे रक्षण करणे आज अधिक गरजेचे आहे,असे विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दलितोध्दारक चळवळीचे प्रणेते महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करताना म्हटले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मजदूर मंझीलमध्ये अभिवादन समारंभ पार पडला.प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनीही परंपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.
ज्यांनी नेहमीच डॉक्टर आंबेडकर यांच्या विचाराला विरोध केला, त्यांच्या मांडीलामांडी लाऊन आज लोककल्याणाच्या गमजा मारल्या जात आहेत,हे आंबेडकर यांच्या राष्ट्रभक्तीशी आणि समता विचाराशी विसंगत आहे,असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.
खजिनदार निवृत्ती देसाई यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितोध्दारक चळवळीला उजाळा दिला.सेक्रेटरी शिवाजी काळे आदीं नी श्रध्दांजली वाहिली.****

COMMENTS