हिमायतनगर प्रतिनिधी /अनिल नाईक
महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिमायतनगर येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेने शाखेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजीत केला होता. या कार्यक्रमाला हिमायतनगर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते. सुरूवातीला महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. त्यानंतर नियमित कर्ज भरणा करणारे शेतकरी दिलीपराव थोंबाळे, साहेबराव सुर्यवंशी, किसन देवसरकर, ज्ञानेश्वर काईतवाड ,सवर्णमाला सुर्यवंशी, सुनिता थोंबाळे, नितेश जयस्वाल, श्रीराम कदम, एम. डी. कदम, सुभाष माने, बाबुराव वाघमारे, दत्ता कोमलवार, दत्ता देवसरकर, उत्तम उपलवाड यांचा बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शाखा प्रमुखांनी पिककर्ज धारक शेतकऱ्यांनी यावर्षी देखिल पिककर्ज नुतनीकरण करूण बँकेच्या सामाजीक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला शाखा व्यवस्थापक मनिष खोडे, ऋषिकेश मुळे, शरद सर, बँक कर्मचारी विजयकुमार शिंदे, बँक मित्र संजय कदम पळसपुरकर, किशोर जयस्वाल, परमेश्वर शिंदे, परमेश्वर काळे, संतोष गोरे, तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बाधवासह भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS