मुंबई :- उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मामाचा गाव, कैऱ्या, आंब्यांची मजा आणि उनाडपणा एवढेच समीकरण मर्यादित नसून, आता काळानुरूप यात उन्हाळी प्रशिक्षण शिबीरांची भर पडली आहे. व्यक्तिमत्त्व विकास, चौकस बुद्धी, ॲक्टिव्हिटी, धाडस निर्माण करणे आणि त्यांची आवड ओळखण्याची हीच खरी वेळ असते.
मुलांच्या व्यक्तिमत्त्वात योग्य बदल घडावेत, नेहमीच्या संरक्षित वातावरणातून बाहेर पडून त्यांची निर्णय क्षमता विकसित व्हावी याकरिता शीव शिक्षण संस्था संचालित ,डी. एस. हायस्कूल ,सायन येथे उन्हाळी शिबीर प्रशिक्षण वर्ग (दि.१० ते २१ एप्रिल)
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत.या प्रशिक्षण वर्गामध्ये भौमितिक प्रतिकृती, जोडीकार्य – गटकार्य, गंमत खेळ, छोटे खेळ विविध स्पर्धा, योगा – सूर्यनमस्कार, भाषिक कोडी सोडविणे, कथा-कथन, मुलाखत तंत्र, पद्य प्रार्थना, संगीत , शिवण - हस्तकला यांचे तसेच संस्कृत व स्पोकन इंग्रजी या विविध सत्रांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे .
डी.एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली
मुख्याध्यापिका शुभांगी गायकवाड , कल्पना पाटील यांसह इतर शिक्षक ही शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
डी.एस. हायस्कूलने आयोजित केलेल्या या उन्हाळी धमाल शिबरात सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पालकांचाही या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

COMMENTS