मुखेड / प्रतिनिधी नगर परिषदेच्या वतीने स्मशानभूमीचे एक करोड रुपयाचे काम, तिन करोडचे रस्त्याचे काम, कचरा संकलन केंद्रात विविध पाच का...
मुखेड / प्रतिनिधी
नगर परिषदेच्या वतीने स्मशानभूमीचे एक करोड रुपयाचे काम, तिन करोडचे रस्त्याचे काम, कचरा संकलन केंद्रात विविध पाच कामात भ्रष्टाचार, सत्तर लाख खर्चून अभ्यासिकेचे काम कुचकामी झाले, नगर अभियंता नारलावार यांच्या संपत्तीची चौकशी करावी ही मागणी व सुरू असलेल्या सत्ताधाऱ्याच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात आज दि.२३ मार्च रोजी मोतीनाला येथील स्मशानभूमीत बेमुदत सत्याग्रह सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड यांनी करणार आहेत.
मुखेड येथील नगर परिषदच्या वतीने मोतीनाला स्मशान भूमी येथे एक करोड रुपयाचे नुतनीकरण काम चालू असुन विस्तारीत बैठक वॉचमन निवास सह पुर प्रवणभाग असल्याने पुर संरक्षक भिंतीचे काम चालू आहे. सदर कामात पूर्व पश्चिम भागाची भिंत बांधली गेली असुन ज्या उत्तर बाजुने नदी प्रवाहीत आहे त्या बाजुने भिंत बांधली गेली नाही. तसे अंदाजपत्रक पहाणी अहवालात नमुद केले गेले नाही. तसेच नवीन शवदाहीका ही अत्यंत तकलादु असुन ती उष्णतेने विरगळुन जाईल इतकी निकृष्ठ आहे शवदाहीकेचा चौथरा शेड विस्तार आवश्यक असताना अगोदरच्या जागेत तिसरी शवदाहीका बसवली गेली असून तेथे अंत्यविधीला अडथळा ठरणार आहे. पेव्हर ब्लॉक्स ८० एम.एम. पेक्षा कमी असुन त्यांचा दर्जा निकृष्ठ आहे व या कामासाठी वापरले सिमेंट, स्टिल, क्रशसँड इतर साहित्यात रेशो सांभाळला गेला नाही. तसेच
डम्पींग ग्राउंड मुखेड येथे संरक्षक भिंत तसेच विघटन केंद्र साठवण केंद्राचे विविध पाच निविदा अन्वये कामे चालु असुन या पैकी कुठलाच कंत्राटदार ते काम करीत नाही तथापी हे काम बेकायदेशीर रित्या सबकॉन्ट्रॅक्टर राम गोविंद पत्तेवार करीत आहेत तसेच या कामावर कंत्राटदारांचा अथवा पालिकेचा कुठलाच अभियंता देखरेख करीत नसुन रात्रीच्या अंधारात युध्द पातळीवर थातुर मातुर काम उरकले जात असुन हे कामे पुर्णतः निकृष्ठ केली जात आहेत. व संरक्षक भिंतीचे काम समान उंची व लाईन दोरी सुध्दा मेंटन केली गेली नाही. महाजन पंप ते न.प. रस्ता अनावश्यक वळन देऊन रस्ता रुंदी कमी जास्त करणे त्यासह संपूर्ण कामात निकृष्ठ साहित्य व थिकनेस प्रमाणे काम केले जात नाही.
स्वर्गीय आमदार गोविंदरावजी राठोड अभ्यासिका लाखो रुपये खर्चुन उभारली असून या कामात वापरलेले टाईल्स, फर्निचर, इंटेरीयर अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून या कामाचे फेर मुल्यांकन त्रयस्त यंत्रने मार्फत करुन संबंधीत गुत्तेदार दोषी अभियंते यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करावी नगर अभियंता उत्तम नारलावार यांनी निकृष्ठ कामे करुन करोडोची बेनामी व उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केली प्रकरणी चौकशी व्हावी शहरातील ७० टक्के कामे इतर गुत्तेदारांचे मार्फत घेऊन निकृष्ठ काम करणारे सबकॉन्ट्रॅक्टर राम गोविंद पत्तेवार सन २०१४ साली मजुरी करत होते ते आज शहरातील करोडोच्या मालमत्तेचे धनी कसे या बाबत सक्त वसुली संचालनालय नागपुर यांना कारवाई प्रस्तावीत करावी या मागणी घेऊन दि.२३ मार्च रोजी मोतीनाला स्मशानभुमी येथील नवीन निकृष्ठ शवदाहीकेत बसुन बेमुदत स्मशान सत्यागृह करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

COMMENTS