लोहा,(प्रतिनिधी) लोहा तालुक्यातील गेली दोन दिवसात दि.(१६)व (१७) मार्च रोजी गुरूवारी,शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व...
लोहा,(प्रतिनिधी) लोहा तालुक्यातील गेली दोन दिवसात दि.(१६)व (१७) मार्च रोजी गुरूवारी,शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकाचे बरेच नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार समोर आले आहे. प्राप्त अहवालानुसार जीवीत हानी व पिक नुकसान यात - तीन जनावरे मयत व एक जखमी झाले असून दोन मनुष्य जखमी झाली आहेत.बाधित शेतकरी संख्या ५६०, जिरायत बाधित क्षेत्र ७० हे.आर,बागायत बाधित क्षेत्र १४० हे.आर, फळबाग बाधित क्षेत्र ५ हे.आर तर एकूण बाधित क्षेत्र २१४ हे.आर असा प्राथमिक अहवाल असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली तसेच तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिले. दिनांक १६ व १७ मार्च रोजी गुरवारी व शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार कापसी (बु),सावरगाव (न.) व लोहा मंडळ मधील परिसरातील २० ते २२ गावात कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पाहणी नुसार रब्बी पिकाचे ३३ टक्क्याच्या वर नुकसान दिसून आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तसे पंचनामे करण्याचे आदेशही संबंधित गावचे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना देण्यातआले असल्याचे लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले. आहेत. लोहा तालुक्यात गेली दोन दिवस गुरूवारी व शुक्रवारी झालेल्या बेमोसमी पावसामुळे लोहा तालुक्यातील कापसी बु., सावरगाव न. व लोहा मंडळातील परिसरातील २० ते २२ गावातील वादळी वारे, जोराचा पाऊस व गारपीटीमुळे रब्बी,ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, टरबूज इत्यादी पिकांचे कृषी व महसूल विभागाचे संयुक्त प्राथमिक पाहणीनुसार३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित मंडळातील संबंधित गावच्या तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी तात्काळ ३३टक्क्यांच्या वर पीक नुकसानीचे सर्वेक्षण व पाहणी करून पंचनामे करावेत व अंतिम पीक नुकसानीचा अहवाल सात दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीत संयुक्त स्वाक्षरीशी सादर करावा. त्याबरोबरच इतर महसूल मंडळ विभाग व सज्जा अंतर्गत गावात त्या त्या गावचे तलाठी कशी सहाय्यक व त्यांचे महसूल कृषी मंडळ पर्यवेक्षक यांनी ते ३३ टक्केच्या वर नुकसान झालेले आहे की नाही याबाबत पाहणी करून नुकसान असल्यास पंचनामे करून सविस्तर अहवाल सादर करावा जर ३३ टक्क्यांच्या वर कोणतेही नुकसान झालेले नसेल तर तसा निरंक अहवाल महसूल व कृषी विभागाचा कर्मचारी व अधिकारी यांनी संयुक्त स्वाक्षरीने तीन दिवसाच्या आत सादर करावा असेही नमुद केले.

COMMENTS