दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी सायन्स कॉलेज इको फ्रेन्डली कमीटी नांदेड व नागरिक कृति समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात...
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी सायन्स कॉलेज इको फ्रेन्डली कमीटी नांदेड व नागरिक कृति समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा फुले पुतळ्याजवळ समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा कुप्रथा विरोधी होळी करुण समाज जागृतीचे कार्य नुकतेच पार पडले.
नागरिक कृति समिती नांदेड येथील सर्व सदस्यांनी मा. खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पुतळ्या जवळ होळी पार पडली. यावेळी सुरवातीलाच सर्व सदस्यांनी व सायन्स कॉलेज इको फ्रेन्डली कमीटीच्या सर्व विद्याथ्यांनी महात्मा फुले पुतळ्याच्या परिसरातील सर्व कचरा व प्लास्टीक गोळा करुण ते एकत्र केले. कार्यक्रमात बोलतांना डॉ. काब्दे यांनी असे सांगीतले की अनिष्ट चाली रीती व रुढी परंपरा या समाजाला लागलेली कीड असून त्याची होळी झाली पाहीजे. भारताला एक आदर्श व आधुनीक राष्ट्र निर्माण करण्यात महत्वाची भुमिका आजच्या तरुण पिढीची आहे. असे मत यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष मा. खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी युवकांना संदेश देतांना सांगीतले.
यावेळी उपस्थितांनी समाजिक कुप्रथेच्या विरोधात घोषणांच्या माध्यमातून होळी सण साजरा केला. समाजीक कुप्रथा अथवा अनिष्ठ चाली रिती जश्या की, हुंडा प्रथेची होळी झाली पाहीजे, जातीयतेची व धर्मांधतेची होळी, भ्रष्टाचाराची होळी व इतर सर्व वाईट चालीरितीची होळी झाली तरच भारत एक विकसीत राष्ट्र निर्माण होवून राष्ट्राची प्रगती होईल असे मत यावेळी डॉ. काब्दे यांनी मांडले. कार्यक्रमांचे प्रास्तावीक आणि आभार प्रदर्शन सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य तथा समितीचे समन्वयक प्रो. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. यावेळी एडवोकेट धोंडीबा पवार, डॉ. पुष्पा कोकीळ, डॉ. के. के. जामकर, श्री हरीष ठक्कर, डॉ. किरण चिंद्रावार, प्रो. डॉ. डी. एन. मोरे, श्री बालाजी टिमकीकर, महेश शुक्ला, रमेश घुमनवाड, सायन्स कॉलेजच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. अरुणा राजेंद्र शुक्ल, प्रा. धूतमल के.एस., प्रा. हिवरे अजय, प्रा. कार्तीक जाधव, प्रा. शिवाजी मोरे, श्री राजीव जाई, श्री गवारे यांच्या सह विविध संघटनेचे सदस्य च सायन्स कॉलेज इको फ्रेन्डली कमीटीच्या इतर सदस्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली.

COMMENTS