- प्रवासी महिलांनी त्यांच्याकडे व्यक्त केली शासनाप्रति कृतज्ञता नांदेड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
- प्रवासी महिलांनी त्यांच्याकडे व्यक्त केली शासनाप्रति कृतज्ञता
नांदेड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य परिवहन महामंडलाच्या बसमधून प्रवास करण्यासाठी महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरु झाल्यानंतर
दुस-या दिवशी शनिवारी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी दुपारी मुखेड ते नांदेड असा बसने प्रवास केला. यावेळी त्यांनी बसमधील सहकारी महिलांशी संवाद साधला असता, त्यांनी राज्य शासनाप्रति त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली.
राज्य परिवहन महामंडलाच्या प्रवास दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा स्वागताहार्य निर्णय घेतला आहे. या निर्णयाची शुक्रवार १७ मार्चपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर
शनिवार १८ मार्च रोजी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास मुखेड ते नांदेड असा प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून केला. या बसमधून इतर प्रवाशांसह कांही अंगणवाडी सेविका प्रवास करीत होत्या. त्यांच्याशी सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी हितगूज केले असता, राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचा विधायक निर्णय घेतांनाच सर्व महिलांना एसटी बसच्या प्रवास दरात ५० टक्के सवलत दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन शासनाचे आभार मानले. सवलतीच्या दरात प्रवास करतांना अनेक महिला अक्षरश: भाऊक झाल्या होत्या. सदरील प्रवासादरम्यान महिलांना शाल व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
सौ.प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांच्यासमवेत बसमधून प्रवास करतांना डॉ.शारदाताई हिमगिरे, मुखेड शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, इसाक तांबोळी, बजरंग कल्याणी, सचिन रिंदकवाले, रवी गंदपवाड, सतीश डाकूरवार, आकाश पाटील केरूरकर, बाबुराव पाटील जांभळीकर, मारुती पाटील आमनर, रावसाब पाटील माकणीकर, पवन पोतदार, नामदेव शिंदे, गजानन लोखंडे, ज्ञानेश्वर डोईजड आदी उपस्थित होते

COMMENTS