नांदेड प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून (ता.20 मा...
नांदेड प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून (ता.20 मार्च ते 10 एप्रिल) पर्यंत स्पर्धकांनी पाच मिनिटाचा विषयानुरूप व्हिडिओ बनवून पाठविण्याचे आवाहन संयोजक लक्ष्मण अरविंद वाठोरे पाथरडकर मोबाईल ७०५८७९७६८६ यांनी केले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून वक्तृत्वाचा विषय 'सर्वश्रेष्ठ, एकनिष्ठ भारतासाठी:भारतीय संविधान' हा आहे. पहिल्या तीन विजेत्यांना पाच हजार रुपये व प्रमाणपत्र,तीन हजार रुपये व प्रमाणपत्र,दोन हजार रुपये व प्रमाणपत्र पारितोषिक म्हणून आहेत.विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक फोन पे,गूगल पे द्वारे पाठविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लक्ष्मण वाठोरे यांनी दिली आहे.

COMMENTS