बिलोली — बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथिल रहिवाशी पत्रकार यादवराव लोकडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे पाच तोळ्याचे दागिने चोरीला ग...
बिलोली — बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथिल रहिवाशी पत्रकार यादवराव लोकडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे पाच तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकिस आली असून सदर प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
सविस्तर वृत्त असे की, सगरोळी येथिल डिजिटल मीडिया वाहिनी महा Live चे पत्रकार यादवराव लोकडे व त्यांचे कुटुंबीय बोधन येथे दवाखान्याच्या कामासाठी गेलो असताना त्यांच्या घरातील दागिने गंठण हार 36 ग्राम व नेकलेस 15 ग्राम असे एकूण 5 तोळे 1 ग्राम 10 गुंज इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेले असून सदर दागिने हे घराच्या बाजूलाच राहणारी नातेवाईकांची मुलगी दागिण्याचा डब्बा मी घेऊन गेलो अस कबूल केले. मात्र मुलीचे आई वडील व तिची आत्या यांनी सदर प्रकरणी चोरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याने सदर दागिने आमच्या घरात नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी मुलगी स्नेहा गायकवाड, व तिची आई वडील व आत्या यांच्या विरुद्ध सौ. कल्पना यादवराव लोकडे यांनी दिलेल्या तक्रारवरून 42/23 कलम 380 34भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास SB 2049 आंबेवार हे करीत आहेत.

COMMENTS