नांदेड : वसमत येथे होत असलेल्या हळद संशोधन केंद्र व शेतकऱ्यांच्या इतर मागण्या संदर्भात खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता मोदींना त्यांनी कृषी भूषण भगवान इंगोले यांच्या शेतातील सेंद्रिय हळद, गूळ,दाळ भेट देऊन सेंद्रिय शेतीची माहिती दिली. शेतकऱ्यानी उत्पादित केलेल्या सेंद्रिय उत्पादनाची मोदींनी कुतूहलाने चौकशी करून कौतुक केले. खासदार हेमंत पाटील यांच्या चिकित्सक वृत्तीमुळे देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींना अन्य काही भेटवस्तू नेण्याऐवजी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हळद गूळ डाळ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले त्यामुळे शेतकऱ्यांचाही मोठा गौरव झाल्याची भावना सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
काल दिनांक 17 रोजी खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. राज्य शासनाच्या माध्यमातून वसमत येथे होत असलेले हळद संशोधन केंद्र हे शेतकऱ्यांसाठी महिलाचा दगड ठरावे यासाठी खासदार हेमंत पाटील हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. जगभरात सर्वाधिक हळद ही भारतात होते देशात सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा म्हणजे हिंगोली आहे त्यामुळे येथे हळद संशोधन केंद्र होणे गरजेचे होते. या ठिकाणी हळदीवरचं संशोधन प्रक्रिया मार्केटिंग आदीवर काम होऊन त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कृषिभूषण भगवान इंगोले यांनी ओम शांती ऑरगॅनिक गट मालेगाव यांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतमालाची मोहिमाता व्यापक स्वरूपात चळवळीचे रूप घेत आहे . खासदार हेमंत पाटील यांनी देशातील सर्वोच्च नेत्याला सामान्य शेतकऱ्यांचा शेतमाल भेट देऊन सन्मानित केल्याबद्दल शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले, ओम ऑरगॅनिक गटाचे भगवान इंगोले,संदीप डाकुलगे, अमोल सावंत, एकनाथराव पाटील , भीमराव इंगोले, चंदेवार यांनी आभार मानले

COMMENTS