गारपीट व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी.
नादेड जिल्ह्यात काल वादळी वारा व गारपीटीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून सरकारने हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन आज भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी अर्धापुर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड भोकर अर्धापुर तालुक्या मध्ये काल झालेल्या वादळी वारा व गारपीटी मुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने केळी , टरबूज , भाजीपाला हरबरा व अन्य ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या मुळे शेतकऱ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. आत्महत्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते असे वातावरण तयार झाले आहे. यामुळे मा मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन मदतीच्या निकषात बदल करून हेक्टरी एक लाख रुपये मदत तात्काळ जाहीर करावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे संतोष गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनावर अरविंद देशमुख , शेख मकसूद आनंद शिनगारे, शेरू भाई, महंमद अय्याज, शेख हर्षद, शेख रईस जानी, उत्तम पवार, सचिन गायकवाड, परवेश पटेल, ए बी कलाम, शेख तोहीद, शेख आवेश, शिवदास बारसे, सोहेल खान, आखतर खान, आणि अनेक कर्यांकरतांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

COMMENTS