मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
कै.व्यंकटराव बळीराम पाटील बेटमोगरेकर यांचे दि.१८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील ब्रीच कॅंडी हॉस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
ते राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्व.माधवराव पाटील बेटमोगरेकर यांचे बंधू व मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व संजय पाटील बेटमोगरेकर यांचे ते वडिल होते.कै.व्यंकटराव बळीराम पाटील हे बेटमोगरा व पंचक्रोशीतील परिसरात धाकले बाबा या नावाने परिचित होते.मृत्यु दरम्यान त्यांचे वय ८३ वर्षे होते.
कै.व्यंकटराव बळीराम पाटील यांची अंत्यविधी मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.१९ मार्च रविवार रोजी दुपारी ३ वाजता गावातील त्यांच्या शेतात होणार आहे.त्यांच्या पश्चात तिन मुले,एक मुलगी,जावई,सुना,नातू,नाती,पणतू आहेत. ते जिल्हाधिकारी (स्टॅम्प) हरीश पाटील,अप्पर आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,आणि उपविभागीय अधिकारी विकास माने, पंकज पाटील चव्हाण यांचे ते आजे सासरे होत.
त्यांच्या निधनाने बेटमोगरा सह मुखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

COMMENTS