लोहा,(प्रतिनिधी) गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी तेलंगणा सरकारने विविध योजना राबवून सर्व सामान्यासह शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचा बहर आणल...
लोहा,(प्रतिनिधी)
गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी तेलंगणा सरकारने विविध योजना राबवून सर्व सामान्यासह शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचा बहर आणला. विविध विकास योजना अमलात आणल्यामुळे तेलंगणामध्ये विकासाची गंगा वाहत आहे. सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढविल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. हेच विकासाचे मॉडेल तेलंगणा राज्यात राबविलेले महाराष्ट्र राज्यात राबवू अशी ग्वाही तेलंगणातील अकणूरचे आमदार जीवन अण्णा रेड्डी यांनी आज येथे दिली. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नंदी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे सचिव हिमांशू तिवारी, दत्ता पवार, बी आर एस चे महाराष्ट्राचे अध्यक्ष माणिकराव कदम , जि प चे माजी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, संजय पाटील कराळे, डॉ. सुनील धोंडगे, छत्रु महाराज स्वामी,जीवन वडजे, राजकुमार केकाटे उपस्थित होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात नांदेड नंतर लोहा येथील दुसरी सभा २६ मार्च रोजी होणार असून या सभेच्या पार्श्वभूमीवर पुढे बोलतांना आमदार जीवन अण्णा रेड्डी म्हणाले कि, तेलंगणा राज्यामध्ये नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा तेलंगणा सरकारने दिले आहेत गोरगरीब जनतेचा विमा काढला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. तेलंगणा सरकार साडेचारशे विविध योजना राज्यात राबवत असून एक लाख करोड खर्चून शेती ओलीताखाली आणली.तसेच दलितांना विना परतावा दहा लाख रुपये देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे. वीस लाख विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली आहे. 25 लाख लोकांना रोजगार च्या संधी उपलब्ध करून दिल्या. हा तेलंगणा चा विकासचा मॉडेल महाराष्ट्रात राबविणार असल्याचे आमदार रेड्डी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात 16 तालुक्यात बैठका घेण्याचे काम सुरू असून जनतेमधून महाराष्ट्र सरकार बदल नाराजीचा सूर उमटत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत एकही योजना सरकारने अंमलात आणली नाही असाआरोप आमदार रेड्डी यांनी केला. आमचे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे असून मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची लोहा येथील 26 मार्च रोजी होणारी सभा ऐतिहासिक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपकी बार किसान सरकार हा नारा घेऊन आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार आणणार आहोत यासाठी प्रयत्न सुरू असून जनतेच्या विकासासाठी यांनी पुनरुचार केला
याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय सचिव हुमाशू तिवारी म्हणाले की, महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात रेल्वेने पाणी आणावे लागते ही शरमेची बाब असून पिण्याचे पाणी मूलभूत समस्या हे सरकार दूर करत नाही आमचे सरकार आणल्यास तेलंगणाचे विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात राबवू ,24 तास वीज उपलब्ध करून देऊ,गुजरात मॉडेल फेल असल्याचे सांगून महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पत्रकार परिषद सांगितले या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन गोविंद पवार भुकमारीकर यांनी केले

COMMENTS