किनवट - तालुक्यातील बेंदी तांडा येथील रहिवाशी,किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती,कडवट शिवसैनिक भाऊराव पांडु...
किनवट - तालुक्यातील बेंदी तांडा येथील रहिवाशी,किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती,कडवट शिवसैनिक भाऊराव पांडुरंगराव राठोड ( वय ६०) यांचे रविवारी दि.१९ सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने किनवट येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,२मुले,१ मुलगी असा परिवार आहे.आयुष्याच्या अखेरपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या राठोड यांचे सर्वच राजकीय पक्षांतील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या निधनाबद्दल खासदार हेमंत पाटील यांच्यासह अनेकांनी दुःख व्यक्त केले.भाऊराव राठोड यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बेंदी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

COMMENTS