किनवट - तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांची...
किनवट - तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांची हानी झाली.महसूल प्रशासनाच्यावतीने रविवार दि.१९ पासून नुकसानीचे पंचनामे सुरु झाले.सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले,तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी थेट बांधावर भेटी दिल्या. किनवट तालुक्यात शुक्रवार दि.१७ पासून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. रब्बीतील गहू,हरभरा,ज्वारी आदी पिके हाताशी आली असतानाच बेमोसमी पाऊस,गारपिटीमुळे पिकांसह फळबागा,भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली.खरिपात अतिवृष्टी आता निसर्गाची पुन्हा वक्रदृष्टी यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.दरम्यान,शनिवारी दि.१८ सायंकाळी आमदार भीमराव केराम यांनी बोधडी,इस्लापूर भागातील काही शिवारातील नुकसानीची पाहाणी केली.त्यानंतर रविवारी सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले,तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्यासह महसूलच्या पथकाने तालुक्यातील बोधडी,थारा,दिग्रस,चंद्रपूर,पिं

COMMENTS