परभणी ( ) टेनिसव्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने दिल्ली टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि ५ ते ७ जानेवारी दरम्यान २४ वी राज्य वरिष्ठ गट टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला संघ, मिश्र दुहेरी व वयस्कर गट सहभागी झाले होते. यात पुरुष राज्य संघाने कांस्यपदक पटवले साखळी सामन्यात विजयी होऊन, उपांत्य फेरीत राजस्थान वि महाराष्ट्र संघात २:१ कडवी झुंज देऊन महाराष्ट्र राज्य संघ पराभव झाला. कांस्यपदक लढतीत महाराष्ट्र वि मध्ये प्रदेश दरम्यान २:१ लढतीत महाराष्ट्र पुरुष संघास कांस्यपदक पटकावले.
पुरुष संघ:- प्रफुल्ल कुमार बन्सोड,( पुणे)असिफ मुल्लानी,(सांगली) कमलेश नावाडे, सिध्दार्थ लिपने, चैतन्य नावाडे (परभणी) राहुल पेटकर,(लातूर)
वयस्कर दुहेरी गटात सतिश नावाडे व किरण घोलप या दुहेरी गटात कांस्यपदक पटकावले.
महिला संघ साखळी फेरीतून पुर्व उपांत्य फेरीत बाद झाला.
महिला संघ:- शिंदे संध्या, कोकाटे रेवती,(अकोला),दुधाटे पार्वती, गोसावी साक्षी, दुधाटे राणी,(परभणी) खराटे रिद्धी,(नाशिक)
मिश्र दुहेरी संघ: निनाद राहाटी (मुंबई) चंदावरकर मनीषा.(परभणी)
प्रशिक्षक: सतिश नावाडे, संघव्यवस्थापक: गजानन शिंदे.
यशस्वी संघाचे अभिनंदन टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड,मा.आ. हरीभाऊ काका लहाने, खा.संजय जाधव, नगराध्यक्ष विनोद बोराडे, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य चिटणीस गणेश माळवे, उपाध्यक्ष डॉ.नंदकुमार देशपांडे, डॉ. आबासाहेब शिरसाट, डॉ दिनेश शिगारम,किशोर चौधरी,
फोटो ओळ:- दिल्ली येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष, वयस्कर संघास कांस्यपदक व चषक देताना केंद्रीय आदिवासी विकास मंत्री खा रावत.संस्थापक अध्यक्ष डॉ व्यंकटेश वांगवाड, महाबली सतपाल सिंग, कुंमकम मॅडम, डॉ नरेंद्र शर्मा, हरीद्रसिंग,

COMMENTS