प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर निसार तांबोळी यांनी परिक्षत्रात दोन वर्षात केलेले कार्य अतिशय उत्कृष्ठ होते. त्यां'या कर्तव्यकठोर कामगिरीमुळे त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ चांगलाच गाजला. परिक्षत्राचा पदभार घेतल्यानंतर हिंगोली, लातुर, नांदेड,परभणी जिल्हय़ातील पोलिस अधिक्षकांची बैठक घेउन परिक्षत्रातील जिल्हयात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही अशा सुचना दिल्या होत्या. मात्र काही अधिकारीयांनी त्यांना हलक्यात घेतल्याने डिआजी तांबोळी यांनी आपला कर्तव्यकठोर पणा दाखवून दिला. यामध्ये डिआजी निसार तांबोळी यांनी परिक्षत्रातील जिल्हयात अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहिम राबवुन चार ही जिल्हयात अवैध धंद्यावर कारवाया करून या मोहिमे अंतर्गत मटका, जुगार, दारू, गुटखा, गांजा आदी अवैध धंद्यावर 370 ठिकाणी कारवाई करून 485 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून एकुण 36 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड परिक्षत्रा'या ईतिहासात पहिल्यांदाच ऐवढी मोठी कारवाई झाली असल्यामुळे डिआजी तांबाळी यां'या विशेष मोहिमेने परिक्षत्रातील अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे दणानले होते. हिंगोली जिल्हयात चोरी छूपे काही ठिकाणी जुगार अड्डे सुरूच होते Óयांची गुप्त माहिती डिआजींना मिळाल्यानंतर तांबाळी यां'या विशेष पथकाने आखाडा बाळापुर व हट्टा पोलिस ठाण्या'या हद्दीत जुगार अड्यावर कारवाई करून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना बेडया ठोकल्या होत्या. यावेळी अवैध धंद्यांना थारा देणारे दोन ठाणेदारांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. यावेळी ठाणेदारांवर कारवाई करून चुकीला माफी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. त्यां'या कार्यकाळात हिंगोली पोलिस दलात जननी महिला सुरक्षा अभियान, एक कॅमेरा माझ्या शहरासाठी, पोलिस दिदी, भरोसा सेल आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. निसार तांबोळी यां'या संकल्पनेतुन त्यां'या कार्यकाळात वाहन तपासणी मोहिम, स्पेशल ड्राईव्ह अभियान, गुन्हेगारी संपुष्ठात अनण्यासाठी ऑल आउट आपरेशन राबविण्यात आले. Óयामध्ये 22 हजार 114 वाहनांची तपासणी करण्यात आली व 31 लाखांचा दंड वसुल करण्यात आला. याबरोबरच निसार तांबोळी यां'या कार्यकाळात सण,उत्सव धार्मीक कार्यक्रम शांततेत पार पडले त्याचे कारण म्हणजे डिआयजी निसार तांबोळी स्वताहा चारही जिल्हयातील धार्मीक कार्यक्रम सण उत्सवावर नजर ठेवून होते. नांदेड परिक्षत्रातील हिंगोली जिल्हयात पहिले चाईल्ड फें्रडली पोलिस ठाण्याची निर्मीती करण्यात आली. पोलिस म्हंटले की भल्याभल्यांना घाम फुटतो तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यास तक्रारदारासोबत असलेली लहान बालके पोलिसांची खाकी वर्दी बघुन लहान मुले घाबरतात त्यांची भिती दुर होण्यासाठी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात चाईल्ड फेंडली पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तसेच महिला भरोसा सेल कक्षाची स्थापना करण्यात आली. वार्षिक तपासणी दरम्यान डिआयजी तांबोळी यांनी पोलिस अधिकारी कर्मचार्यां'या अडअडचणी कुटूंबप्रमुखा प्रमाणे समजुन घेतल्या. अनेक कारवाया त्यां'या कार्यकाळात झाल्या. दरोडा असो की, नांदेड बिल्डर खुन प्रकरण, नौकरीचे अमिष दाखवून विद्यार्थी फसवणुक आदी विविध गुन्ह्यांना त्यांनी वाचा फोडण्याचे काम केले. यामध्ये त्यां'या मार्गदर्शना खाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक उदय खंडेराय व उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांची महत्वपुर्ण कामगिरी राहीली. सर्व घडामोडी पाहता डिआयजी तांबोळी यांची नांदेड रेंज मधील कारकिर्द चांगलीच गाजल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS