औरंगाबाद ( )पुणे येथे चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलंपिक गेम मधे टेबल टेनिस महिला एकेरीत नासिकच्या सायली वाणी हीने नासिकच्याच तनिशा कोटेचा हीचा अंतिम फेरीत ४-२ असा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. अंतिम फेरीच्या सामन्यात सायली हीने पहीला गेम १२-१० जिंकून १-० अशी आघाडी घेतली परंतु पुढचे दोन गेम तानिशाने १०-१२ व ४-११ जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. परंतु सायलीने आपले कसब पूर्ण पणाला लावून पुढील तीन गेम ११-३, ११-७ व ११-८ असे जिंकून ४-२ असा विजय मिळवित महाराष्ट्र राज्य ऑलंपिक गेम्स २०२२ चे टेबल टेनिस महिला एकेरीचे अजिंक्यपद आपल्याकडे राखले. अशा प्रकारे या गटाचे सुवर्ण व रजत पदक असे दोन्ही पदके नासिकने राखण्याचे यश मिळविले.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी तनिशा कोटेचाने उपांत्य फेरीत मुंबई सबर्बनच्या रीशा मिरचंदानी हीचा पराभव केला. तनिशाने अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढाईत पहीले दोन गेम १२-१०, १२-१० जिंकून आपले वर्चस्व राखले. परंतु रीशाने पुढील दोन गेम ११-९, ११-९ जिंकून बरोबरी साधली. परंतु तनिशाने फोरहैण्ड, बैकहैंड व विविध सर्व्हिसचा वापर करून पुढील दोन गेम ११-७, ११-९ जिंकून ४-२ असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुस-या उपांत्य फेरीच्या नासिकच्याच सायली वाणी हीने उपांत्य फेरीत पुण्याच्या पृथा वर्टिकर हीचा ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सायलीने पहिला गेम ४-११ असा गमावला परंतु त्यानंतर आपल्या अनुभवाचा वापर करून ११-६, ११-३, ११-८ व ११-९ असे सरळ पुढील चार गेम जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
सांघिक गटात नासिकच्या पुरुष व महिला या दोन्ही संघानी कांस्य पदक पटकावले. पुरुष संघात कुशल चोपडा, नुतांशु दायमा, पुनीत देसाई, अजिंक्य शिंत्रे, सुजित कळसेकर तर महिला संघात सायली वाणी, तनिशा कोटेचा, मिताली पुरकर, जान्हवी कळसेकर, अनन्या फडके यांचा समावेश होता.
२२ वर्षानंतर झालेल्या पहिल्याच महाराष्ट्र ओलम्पिक स्पर्धेतील महिला एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत दोन्ही खेळाडू नासिकच्याच असल्याचा आनंद व्यक्त करतांना नासिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी याचे श्रेय या दोन्ही खेळाडूंच्या कठोर मेहनतीला दीले. त्याच बरोबर तसेच त्यांचे प्रशिक्षक जय मोडक यांचे अचूक मार्गदर्शन यामुळे त्यांचाही यात खारीचा वाटा असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. यांच्या या विजयाबद्दल संघटनेचे उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, सचिव राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, जय मोडक, संजय वसंत, सतीश पटेल, रामलू पारे, गणेश माळवे, भैया गरुड, महेंद्र चिपळूणकर, संजय मोडक यांनी अभिनंदन केले.
शेखर भंडारी
उपाध्यक्ष
नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन
फोटो कॅप्शन : - पदक विजेत्या सायली वाणी, तनिषा कोटेचा सोबत महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय शेटे, राजेश भरवीरकर व जय मोडक

COMMENTS