मुंबई दि.१८: जयप्रकाश छाजेड यांना वडिलांकडून महात्मा गांधी विचारांचा वारसा लाभला.परंतू त्यांची जगण्याची एक वेगळी पध्दत होती.कोणत्याही कार्यामधील चिकाटी आणि जिद्द त्यांनी कधी सोडली नाही.एस.टी.कामगाराला न्याय देणे हे त्यांचे स्वप्न होते,ते पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,आशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे.
केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष,महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, कॉंग्रेसचे नेते आणि एसटी कामगार नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे १०जानेवारी रोजी नाशिक येथे ह्रुदयविकाराने निधन झाले (७३). त्यांच्या दु:खद निधनाच्या वृताने कामगार वर्गात आणि कॉंग्रेस वर्तुळात सर्वत्र शोक कळा उमटून आली.महाराष्ट्र इंटकच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्या वेळी रा.मि.म.संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी जयप्रकाश छाजेड यांना श्रद्धांजली वहातांना म्हटले आहे, इंटक असेल किंवा एसटी कामगार संघटना असेल त्यांनी शेवटपर्यंत तळमळीने कार्य केले आहे.कामगार चळवळीत गांधी विचार रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई,कार्याध्यक्ष कैलास कदम
खजिनदार देवराज सिंग,उपाध्यक्ष अनिल गणाचार्य, मुंबई जिल्हा अध्यक्ष दिवाकर दळवी,सिटूचे नेते सय्यद अहमद,पुणे येथील इंटकचे राजेंद्र खराडे आदी मान्यवरांनी आपल्या भाषणात जयप्रकाश छाजेड यांच्या कामगार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला.शोकसभेचे सुत्रसंचलन संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाअध्यक्ष राजन भाई लाड आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वप्रथम दिवंगत नेते जयप्रकाश छाजेड यांच्या तसबिरीला अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.संघाचे उपाध्यक्ष आण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे,जी.बी.गावडे आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.***
***

COMMENTS