नांदेड. (विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवा सचिव संजय सोनटक्के यांची आजाद समाज पार्टीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवा सचिव संजय सोनटक्के यांच्या सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन आजाद समाज पार्टीकडून त्यांची आजाद समाज पार्टीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील वाकेकर यांनी नुकतीच एका नियुक्तीपत्राद्वारे संजय परशुराम सोनटक्के यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड केली.
दरम्यान, संजय सोनटक्के यांनी, आजाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या पदाचा नक्कीच आपण समाजातील गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी करणार असल्याचे सांगून, आगामी काळात आपण आजाद समाज पार्टीचे मजबुतीकरण अर्थातच संगठन करण्यासाठी जोमाने कामाला लागणार असल्याची ग्वाही दिली आहे. याप्रसंगी आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील वाकेकर, मराठवाडा अध्यक्ष मंगेश गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश (युवा) प्रदेशाध्यक्ष अतुल बेळीकर, मराठवाडा संपर्क प्रमुख कपिल मोरे व नवनिर्वाचित युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तथा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम वाघमारे आदींची उपस्थिती होती. संजय सोनटक्के यांच्या उपरोल्लेखित नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
.jpg)
COMMENTS