प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर हिंगोली पोलिसांची कामगिरी चांगलीच चर्चेत आहे. आपल्या परिवारापासुन हरवलेला दोन वर्षांच्या बालकाला काही वेळातच परिवाराच्या स्वाधीन केल्याने सेनगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सेनगाव परिसरातील एका बालाजी मंदिर परिसरात एक दोन वर्षाचा बालक रडताना सेनगाव येथील आकाश जांगीड व संतोष हरण यांना दिसला यावेळी सदर नागरिकांनी आजुबाजुला पाहणी व विचारणा केली मात्र सदर बालकाचे नातेवाईक आढळून आले नाही. यावेळी सदर नागरिकांनी सेनगाव पोलिसांना माहिती दिली यावेळी सेनगाव चे प्रभारी पोलिस निरीक्षक वैजेनाथ मुंढे, बिट जमादार सुभाष चव्हाण, शेखर यादव, संतोष जाधव यांनी तात्काळ पोलिस स्टेशन येथील मोटारसायकल वर बसुन सदर बालकास घेऊन सेनगाव शहरात फिरून लोकांना विचारपुस करून त्याच्या पालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सदर मुलाला बोलता येत नसल्याने व तब्बल दोन तास फिरून ही पालकाचा शोध लागत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यावेळी सेनगाव शहराचे बिट जमादार सुभाष चव्हाण यांनी युक्ती लढवीत सदर बालकास पोलिस स्टेशन च्या चारचाकी वाहनात घेऊन वाहनातील पीए साऊंड सिस्टीम वरून सदर बालका बाबत माहिती देत आव्हान करत पेट्रोलींग करीत असतांनाच पोलिसांच्या पीए सिस्टीम चा आवाज ऐकुन बालकाचे वडील पंजाब कुरवाडे धावत पोलिस वाहनाजवळ आले. सदर बालकाचे नाव विनायक असुन त्याचे वडील पंजाब कुरवाडे हे बराच वेळा पासुन व्याकुळ होऊन सदर बालकाचा शोध घेत होते. पोलिसांसोबत बालकास पाहून वडीलांना आश्रु अनावर झाले. सदर बालकास पोलिसांनी पालकाच्या स्वाधीन केले. यावेळी पंजाब कुरवाडे हे आपल्या परिवारासोबत टिळ्याच्या कार्यक्रमासाठी सेनगाव शहरात आले होते. अशी माहिती पंजाब कुरवाडे यांनी पोलिसांना दिली. विनायक ला पाहून त्याच्या पालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बालकाचे पालक व नागरिक यांनी पोलिसांचे आभार मानले.

COMMENTS