सेलू ( )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमीत
दि. २5 जानेवारी २०२३ बुधवार रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर मालेगाव वि पुर्णा सामन्यात मालेगाव संघाने २० षटकात ८ बाद २०३ धावा केल्या. यात अझर अन्सारी ५१, साजेद २१, अर्जुन -२६, अदेल-३४ धावांचे योगदान दिले . पुर्णा संघाचे गोलंदाजी नजिम खान ,व नवाज प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
२०३ धावांचे प्रतिउत्तर देताना पुर्णा संघाने १९.५ ,सर्व बाद १३० करताना विशाल ठाकुर ४८, सय्यद सामी ११,अमर: १५ धावा करत तंबूत परतले.
मालेगाव संघाने भेदक मारा करत इरफान शेख, अझर अन्सारी २, इम्रान अहमद प्रत्येकी २-२ गडी बाद करत सामना ७३ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात प्रायोजक प्रतिक काळे यांनी केले. तर पुर्णा संघाचे जादू इंडस्ट्रीज यांनी केले.
दुपारच्या सञात शेफक बीड वि युनाइटेड संभाजीनगर दरम्यान शेफक बीड संघाने 20 षटकात 182 धावा करत 7 बाद झाले. यात प्रदीप जगदाळे 70 धावा, योगदान दिले.
संभाजीनगर संघाच्या वतीने गोलंदाजी मारा करताना
अमित टाक 3 गडी बाद केले.
182 धावांच्या प्रतिउत्तर देताना संभाजीनगर संघाने 19.5षटकात. 166 धावांत 8 गडी बाद झाले.यात अक्षय खरात 46, पवन 35 धावांचे योगदान देऊ शकले. शेफक बीड संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी मुदशिर मुल्ला 3 गडी, बाद करून 16 धावांने विजय खेचून आणला.
सामनावीर पुरस्कार सेलू च्या प्रदीप जगदाळे यास १ हजार रोख व चषक , संभाजी पवार, छगन शेरे, नामदेव डख ,अविनाश शेरे, पवन आडळकर, यांच्या हस्ते देण्यात आले.
आजच्या सामन्याचे प्रायोजक बीड संघाचे पवन आडळकर, तर संभाजीनगर संघाचे रामेश्वर गटकळ, ग्रुप यांनी केले.
नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ काका लहाने, यांनी केले. सचिव संदीप लहाने
, पठाण खाजा भाई, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा संयोजक:- गिरीश लोडाया, सहसंयोजक:- अविनाश शेरे, हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर, यांनी परीश्रम घेतले.

COMMENTS