*परभणी जिल्हा थ्रोबॉल संघ जिल्हाधिकारी आंचल गोयल, तर क्रिकेट संघ अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या कर्णधार पदी विजयी*
परभणी (. ) : महसूल विभागीय क्रीडा महोत्सवाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडांगणावर दि.८ ते १० जानेवारी दरम्यान संपन्न झाल्या.
विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा मध्ये नांदेड जिल्हा विजेता तर परभणी उपविजेता तर औरंगाबाद तृतीय ठरला.
या स्पर्धेत ४३ क्रीडा प्रकार च्या वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महसूलचे १८०० वर जिल्हाधिकारी ते अधिकारी, कर्मचारी, कोतवाल, वाहन चालक सहभागी झाले आहेत.
विभाग आयुक्त सुनिल केंद्रेकर हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले, अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.
कोणत्याही संघाला कमी न लेखता स्पर्धेला स्पर्धा समजून खेळावे, खेळातून मिळालेल्या ऊर्जेतून पुन्हा नव्याने कामाला लागावे, असे आवाहन सुनील केंद्रेकर यांनी केले
परभणी जिल्हा तील २०० खेळाडूंचा चम्मू जिल्हाधिकारी आंचल गोयल नेतृत्व खाली सहभागी झाला होता.
परभणी जिल्हा ने क्रिकेट स्पर्धेत अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या कर्णधार पदीच्या नेतृत्व खाली तब्बल ४ वर्षानंतर विजेता ठरला.
क्रिकेट चाअंतिम सामना परभणी वि बीड दरम्यान होऊन परभणी जिल्हा क्रिकेट संघाने ५५ धावाने विजेता ठरला. परभणी जिल्हा संघाने १५ षटकात १५३ धावा केल्या यात चंद्रकांत परळीकर (३५), राम कनले (२१), दिनेश सर्वेदे (१३), डॉ.प्रताप काळे (११)धावांचे योगदान दिले.
१५३ धावांच्या प्रतिउत्तर बीड जिल्हा ने १५ षटकात ७बाद ९७ धावा करु शकले .
परभणी जिल्हा थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नेतृत्वाखाली विजेता ठरला.
सेलू तालुक्याने वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन, टेबल टेनिस,धावणे, थ्रोबॉल मध्ये सौ.अरुणा संगेवार, (उपविभागीय अधिकारी सेलू) तर जलतरण स्पर्धेत तहसिलदार दिनेश झांपले विजयी प्राप्त केला.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बीडचे राधा विनोद शर्मा, नांदेडचे अभिजित राऊत, जालना; विजय राठोड, परभणीच्याजिल्हाधिकारी आंचल गोयल, लातूरचे बी. पी. पृथ्वीराज, उस्मानाबादचे सचिन ओंबासे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मिनियार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, डॉ.प्रताप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.


COMMENTS