मुदखेड ता.प्र. मुदखेड शहरातील बौद्ध धम्म भूमी प्रशिक्षण केंद्र येथे दि.१५ जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय पहिल्या बौद्ध धम्म परिषद निमीत्...
मुदखेड ता.प्र.
मुदखेड शहरातील बौद्ध धम्म भूमी प्रशिक्षण केंद्र येथे दि.१५ जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय पहिल्या बौद्ध धम्म परिषद निमीत्त दि.१२ जानेवारी रोजी भिक्खु शिलरत्न थेरो नांदेड व भिक्खु संघपाल थेरो वाजेगाव यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषदे संपन्न झाली.
या पत्रकार परिषदेत १५ जानेवारी रोजी होणाऱ्या धम्म परिषदे संदर्भात भिक्खु संघाने आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी
बौद्ध धम्म भूमी प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
धम्म परिषदेच्या अनुषंगाने बौद्ध धम्म भूमी प्रशिक्षण केंद्र येथे धम्म परिषदेची उत्साहात जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये मंडप उभारणी, सुशोभीकरण, ठिकठिकाणी कार्यक्रमानिमित्त होल्डिंग लावणे, तसेच संपूर्ण बौद्ध धम्म भूमी प्रशिक्षण केंद्र येथे विद्युत रोषणाई, करण्यात आली.
तसेच कालकथीत पूज्य भदन्त पदमरत्न महाथेरो यांच्या असती कलश भिक्खु शिलरत्न थेरो व भिक्खु संघपाल थेरो, यांच्या हस्ते पुष्प अर्पण व वंदन करून चैत्यात ठेवण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेले भिक्खु शिलरत्न थेरो नांदेड व भिक्खु संघपाल थेरो वाजेगाव व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आणि बौद्ध उपासक नवयुवक यांची उपस्थिती होती.

COMMENTS