मुंबई ९: सहकारी मनोरंजन मंडळाच्या वतीने दिवंगत सुप्रसिद्ध कलाकार विकास मल्हारी गांगुर्डे यांच्या द्वितीय स्मृतीदिना निमित्ताने "आ...
मुंबई ९: सहकारी मनोरंजन मंडळाच्या वतीने दिवंगत सुप्रसिद्ध कलाकार विकास मल्हारी गांगुर्डे यांच्या द्वितीय स्मृतीदिना निमित्ताने "आठवणींचा आनंदी जागर " हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सहकारी मनोरंजन मंडळ कला विभाग, दामोदर हॉल मेकअप रूमच्यावर,परेल मुंबई १२ येथे गुरुवार दि.१२ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.०० वाजता हा वैविध्यरुपी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यात नृत्य,गायन आणि अभिनय असा विकास मल्हारी गांगुर्डे यांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम कलाकार आपल्या कलागुणाने साकार करतील. कार्याक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध निर्माते प्रमोद मोहिते भुषवतील.कार्यक्रम विनामूल्य आहे.

COMMENTS