नायजेरियात एम टी हिरोइक इडन या जहाजावरील निर्दोष खलाशांना बेकायदेशीर अटक केली आहे, त्यांची त्वरित सुटका करावी यासाठी २५ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूसी संघटनेतर्फे दिल्लीत नाविक व त्यांच्या कुटुंबीयांनी जोरदार निदर्शने केली. न्यूसीचे प्रतिनिधी प्रकाश ठाकूर हे दिल्लीत नायजेरियाच्या उच्च आयुक्तालयाना भेटून, एम टी हेरोईक इडन जहाजावरील खलाशांना बेकायदेशीर अटक केली आहे, त्यांची त्वरित सुटका करावी अशी खलाशी कामगारांच्या वतीने नायजेरिया उच्च आयुक्तालयासमोर समर्थपणे बाजू मांडली. लंडनला झालेल्या आय टी एफच्या सिफेरर्स सेक्शन कमिटीच्या मिटिंगमध्ये नुसीचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील नायर व मेरीटाईम युनियनचे प्रतिनिधी यांनी नायजेरियात बेकायदेशीर अटक केलेल्या खलाशांची सुटका करण्याबाबत आवाज उठविला.त्यास जगभरातील सर्व संघटनांनी एकमुखानी पाठिंबा दिला.
नायजेरिया मध्ये बेकायदेशीर अटक केलेल्या नाविकांची त्वरित सुटका करण्याची मागणी हजारो नाविकांनी निवेदन देऊन केली आहे. जोपर्यंत नायजेरियाच्या ताब्यात असलेल्या भारतीय खलाशांची सुरक्षितपणे सुटका होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहिल , असे नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS