उदगीर,
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात पालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून कमांडंट कमांडर बी के सिंह, योगगुरु रामचंद्र गरड, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख प्रा. प्रदीप कोठारे, गणित विषयाचे विभाग प्रमुख संतोष चामले , श्रीकांत देवणीकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडंट कमांडर बी के सिंह आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे लक्षात घेऊन त्या क्षेत्रात त्याला करिअर करायला सांगावे. सैनिकी विद्यालयात फक्त पुस्तकी शिक्षण न देता राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणारे शिक्षण दिले जाते. जातीभेद, वर्णभेद, गरीब, श्रीमंत हा भेदभाव विसरुन आपण सर्व एक आहोत, ही शिकवण विद्यार्थ्यांत रुजवण्याचे कार्य विद्यालयाच्या प्रांगणात केले जाते.
पूढे बोलताना ते म्हणाले, विद्यालयाने एनडीए, आय आय टी, जेईई, नीट, भारतीय संरक्षण दल,एनसीसी, क्रीडा क्षेत्र या सर्वच क्षेत्रात आपले उत्कृष्ट निकाल दिले आहेत.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव द्यावा.
विद्यालयातील प्रथम सत्र परीक्षा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यात प्रत्येक वर्गातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पेन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच हैद्राबाद येथे पार पडलेल्या नॅशनल ज्युनिअर फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इ. ०७ वी व इ. ०६ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी हिंदी विषयात छोटी नाटिका सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंबिका पारसेवार व श्रीकांत देवणीकर यांनी केले तर आभार बालाजी मुस्कावाड यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, सुधीर गायकवाड, नागेश पंगू, अरविंद अकनगीरे, सर्व हाऊस मास्टर, वर्गशिक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS