गोदी कामगारांना मुंबई पोर्टच्या दीडशे वर्षांची भेटवस्तू देण्याची मागणी*

मुंबई पोर्टच्या कामगारांना मागील वेतन कराराची थकबाकी, नवीन वेतन कराराची बोलणी त्वरित सुरू करावी, बोनसचा करार ताबडतोब करावा, प्रॉव्हिडंट फं...



मुंबई पोर्टच्या कामगारांना मागील वेतन कराराची थकबाकी, नवीन वेतन कराराची बोलणी त्वरित सुरू करावी, बोनसचा करार ताबडतोब करावा, प्रॉव्हिडंट फंडाला व्याजदर वाढवून द्यावा, तसेच मुंबई पोर्टच्या दीडशे वर्षाच्या विकासात गोदी कामगारांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी मुंबई पोर्टला १०० व १२५ वर्षे झाली, तेंव्हा गोदी कामगारांना भेटवस्तू देण्यात आली होती. आता गोदी कामगारांना दीडशे वर्षांची आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात यावी, अशी मागणी गोदी कामगार नेते सुधाकर अपराज यांनी केली. 

      जवाहर द्वीप (बुचर आयलँड ) बेटावर ७ डिसेंबर २०२२ रोजी सालाबादप्रमाणे जवाहर द्वीप बेटांवरील कामगारांच्या वतीने दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जवाहर बेटावरील वनराईचे सौंदर्य, अथांग महासागर, मोठी रसाळ बोरी, सर्व धर्माची धार्मिक स्थळे, तेलाची जहाजे, तेलाच्या टाक्या, असे खूप काही पाहण्यासारखे आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, मुंबई पोर्ट ट्रस्ट लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, मुंबई पोर्ट मजदूर संघाचे अध्यक्ष प्रभाकर उपरकर या मान्यवरांची मार्गदर्शन पर भाषण झाले. दत्त जयंती उत्सवानिमित्त महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. कोरोनानंतर प्रथमच यावर्षी दत्त जयंती उत्सवासाठी कामगारांनी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे कार्यकर्ते शिवनाथ गायकवाड यांनी केले, तर आभार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष संदीप कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या जवाहर द्वीप येथील दत्त जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंद आचरेकर, सेक्रेटरी श्रीधर बुडबाडकर, कार्यकर्ते सुभाष पालपवाड, सुधीर भाबल, अनंत लिंगायत, विजय अपराध, नरेश जाधव, प्रकाश वरावडेकर, गुरूदत्त वाळंज, शशी ठाकूर, अरुण बामले,विकास चौगुले इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमास भाविकांकडून २८ हजार रुपयांची देणगी जमा झाली.


आपला 

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धी प्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel