*वडेपुरी येथे केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने 'उत्सव स्वातंत्र्याचा' दोन दिवसीय विशेष प्रसिध्दीर अभियान संपन्न*
(दिनांक 16.08.2026)
संयुक्त कुटूंबपध्दती हि कृषी व्यवसायाला समृध्दीसकडे नेण्यासाठी अत्यंत महत्वाची असून काळानुसार बदलत्या कुटूंबपध्दीतीमुळे शेतक-यांना शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत असल्याअचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले. ते लोहा तालुक्यातील वडेपुरी येथे 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड' कार्यालयातर्फे 'उत्सतव स्वातंत्र्याचा ' या अभियानाच्या मुख्य कार्यक्रमात बोलत होते.
वडेपुरी येथील मंदीर सभागृहात' उत्सव स्वातंत्र्याचा ' या अभियानांतर्गत मुख्य कार्यक्रमाचे अयोजन करण्यालत आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर, केंद्रीय संचार ब्यूयरोचे प्रसिध्दी' प्रमुख सुमित दोडल, माजी सभापती दत्तात्रय दळवी,सदाशिव अंबुरे, सरपंच गोपाळ सावळे, उपसरपंच प्रकाश बोडके, रत्नेश्वरी माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक रत्ना्कर फुलारी, जि.प. हायस्कुलच्या मुख्यध्यापिका श्रीमती अंजली कापसे, ग्राम पंचायत अधिकारी गजानन शिंदे, आदींची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी शेतक-यांशी संवाद साधत असतांना हवामानातील बदल, मजुरांचा तुटवडा, यांत्रीकीकरण, वाढती महागाई या सोबतच विभक्त कुटूंबपध्द तीमुळे शेती कमी झाली आणि काम करणा-या सदस्यांंची संख्या देखील कमी झाल्याकमुळे शेती व्यमवसाय तोटयात आणण्याकसाठी कारणीभूत असल्यांचे डॉ. देशमुख यांनी सांगीतले.
यानंतर वडेपुरी हे एक प्रयोगशिल गाव असून पाणलोट क्षेत्र विकासाची कामे असो किंवा कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यााचे सामर्थ्य या गावात असल्याषचे जिल्हा बॅंकेच्याी संचालिका सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थीतांना संबोधले.
मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वरसंगम सेवाभावी संस्थेच्या कलाकारांव्दारे देशभक्तीपर सादर केलेल्यास सुमधुर गीतांनी उपस्थीय विदयार्थी आणि ग्रामस्थांची मने जिंकली.
मुख्य कार्यक्रमापुर्वी ध्वजारोहनानंतर जिल्हा परिषद हायस्कुल आणि रत्नेश्वरी माध्यमिक विदयालयाच्या विदयार्थांच्या सहभागातून ढोलताच्या गजरात “ हर घर तिरंगा” अभियानांतर्गत भव्य 'तिरंगा रॅली' काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम पथकाने सा-यांचे लक्ष वेधले.
दिनांक 14 ऑगस्ट रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या 'कॅच द रेन' या संकल्पलनेवर आधारित अभियानावर येथील जिल्हा परिषद हायस्कु्ल व रत्नेश्वारी माध्यमिक विद्यालयात विदयार्थांच्या’ सहभागातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमांचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूेरो चे प्रसिाध्दी प्रमुख सुमित दोडल यांनी केले तर सुत्रसंचालन सहशिक्षक नागोराव जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीा आयोजनासाठी रमेश नातेवाड, सहशिक्षक_ विठठल मुत्तेपवार, नामदेव बोडके, सुरेश कंधारकर, बालाजी मोरे, उमेश कदम, बदलापुरे सर तसेच ज्ञानेश्वर फुलझळके, बलराज मेरगू आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला वडेपुरी येथील सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक, शेतकरी तसेच गावातील शाळांचे विदयार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते.
*******

COMMENTS