प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
मद्यपान करून वाहन चालविणे गुन्हा आहे. परंतु या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. थर्टी फस्ट च्या रात्री नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असुन नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गडबड गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असुन कडक कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिली आहे.
31 डिसेंबर च्या रात्री शौकीन मंडळी मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागताच्या मुहूर्तावर जल्लोष करतात. या निमित्ताने हाँटेलमध्ये बार मध्ये ओल्या पार्ट्या रंगतात. त्या रात्री मद्यपान करून रस्त्यावर वाहने चालविणारे मोठ्या प्रमाणात आढळतात.असा पोलिसांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास कारवाई चा बडगा उगारण्यात येतो. हिंगोली जिल्ह्यात रस्ते गुळगुळीत झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. थर्टी फर्स्ट च्या रात्री अपघात टाळण्यासाठी रात्रभर पोलिस रस्त्यावर राहणार आहेत. मशीनद्वारे करण्यात येणार वाहनधारकांची अल्कोहोल तपासणी व मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
*काय होऊ शकते कारवाई*
मोटार वाहन कायद्यानुसार 1988 च्या कलम 185 अन्वये मद्यपान करून वाहन चालवील्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी 2 हजार रुपये दंड किंवा 6 महिने कैद किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.पुन्हा हा गुन्हा केल्यास शिक्षेत वाढ होऊ शकते.
*पालकांनी घ्यावी काळजी*
थर्टी फर्स्ट च्या रात्री पालकांनी आपल्या पाल्यांना वाहने देऊ नये.त्यास शक्यतो पार्टी साठी हाँटेलमध्ये जाऊ देऊ नये.आनंदोत्सव आवश्यक साजरा करावा पण कुठलेही गैर कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी व पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

COMMENTS