मुंबई दि.८:राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.ग़.द.आंबेकर यांच्या ५८ व्या स्मृती प्रित्यर्थ आंबेकर स्मृती सप्ताह निमित्ताने मजदूर मंदीर मध्ये महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या संगणक वर्ग, महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, तसेच गिरण्या तील महिला वर्गाने त्यात सहभाग घेतला. संगीतखुर्ची,दोरीवरील उड्या,फूलआम,थ्रोबॉल,बिकेट रिंग, मेणबत्ती पेटविणे, स्मरण शक्ती घ्या स्पर्धा घेण्यात आल्या.
संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई त्या प्रसंगी उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले,आजच्या स्पर्धात्मक युगात महिलानी स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे ठरेल.महिलां मध्ये निर्णयक्षमता वाढविण्यासाठी हे महत्त्वाचे ठरेल.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती ग्राहक संघाचे संचालक विलास डांगे, लेखक प्रसिध्दी प्रमुख काशिनाथ माटल त्यावेळी उपस्थित होते.
प्रियांका परब,ममता घाडी,श्रावणी पवार, चव्हाण यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते
बुधवारी इंडिया यूनायटेड मिल क्रमांक ५मध्ये युनिकेअर हेल्थ सेंटरच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीर पार पडले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन पार पडले.महाव्यवस्थापक नासा, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शशिर्सेकर,बजरंग चव्हाण,मनोहर देसाई आदी उपस्थित होते.युनिकेअरचे अहिरे,तनूजा सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांची आयुर्वेदिक उपचाराने आरोग्य तपासणी पार पडली.

COMMENTS