गंगाखेड (प्रतिनिधी)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छता पंधरवड्यात दिनांक ०१ ऑक्टोंबर 2022 रोजी गंगाखेड पोस्ट ऑफिस तर्फे भव्य रक्तदान शिबिर शहरातील व्यंकटेश विद्यालय येथे घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे आयोजन सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथील ब्लड बँकेच्या मदतीने घेण्यात आले .
कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप जोशी ,प्राचार्य वेंकटेश विद्यालय तर प्रमुख पाहुणे म्हणुन सवंगडी कट्टाचे अतुल तुपकर,मनोज नाव्हेकर ,गजानन महाजन उपस्थित होते. कार्यक्रमात परभणी उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक विनोद कुलकर्णी यांनी रक्तदानाचे महत्त्व व त्याची गरज यावर सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी गंगाखेड, पालम, सोनपेठ, व राणीसावरगाव या पोस्ट कार्यालयाचे अंतर्गत येणार सर्व पोस्टमास्तर ,शाखा डाकपाल व ग्रामीण डाक सेवक यांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात महत्त्वाचे योगदान दिले.
ह्या रक्तदान शिबिरात सवंगडी कट्टा या सामाजिक संघटनेने ही मदत केली.
तसेच गंगाखेड येथील महिला प्रधान एजंट व एसएएस यांचेही योगदान लाभले.
*ह्या शिबिरात ७० रक्तदातांनी रक्तदान केले*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाखेडचे पोस्ट मास्तर डी. के. हाके,विनोद भुतनर दिपक वाघमारे ,ज्ञानेश्वर सावंत,गंगाधर बेंबळे वाल्मिक मुंडे,राजु बायस,सिधार्थ साळवे , रमेश औसेकर, गोपाळ मंत्री व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


COMMENTS