नांदेड,(प्रतिनिधी)-सर्वांच्या लाडक्या नेत्या भाभी माँ माजी आ.अमीताताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दि.6 ऑक्टोबर 2022 रोजी वृद्धाश्रमात फळे...
नांदेड,(प्रतिनिधी)-सर्वांच्या लाडक्या नेत्या भाभी माँ माजी आ.अमीताताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दि.6 ऑक्टोबर 2022 रोजी वृद्धाश्रमात फळेवाटप करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सामाजीक, राजकीय, सांस्कृतीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणार्या भोकर मतदारसंघातील माजी आमदार तथा भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याच्या उपाध्यक्षा भाभी माँ माजी आ.अमीताताई चव्हाण यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. मीमांसा फाऊंडेशन, समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व ह्युमन राईट फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाही हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नांदेड येथील वृद्धाश्रमात फळे वाटप करण्यात येणार आहेत.राजकीय नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन प्रेरणादायी व्यक्तीमत्व असणार्या माजी आ.अमीताताई यांचा वाढदिवसानिमित्त आयोजीत या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, सरवर खान, सौ.संगीताताई बारडकर, सौ.उषाताई दर्डा, सौ.जयश्री राठोड, सौ.सविता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ.अरूणा पुरी, शिवहरी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

COMMENTS