दिनांक 3 आक्टोंबर, 2022 रोजी सायन्स कॉलेज, नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब च्या संयुक्त विद्यमाने ना. ए.सो. नांदेड संस्थे...
दिनांक 3 आक्टोंबर, 2022 रोजी सायन्स कॉलेज, नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब च्या संयुक्त विद्यमाने ना. ए.सो. नांदेड संस्थेचे संस्थापक प.पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती व राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसा निमित्त महाविद्यालयाच्या पुरणमल लाहोटी सभागृहात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांना अभिवादन करुन कार्यक्रम प्रारंभ झाला. शिबीराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. यू. गवई, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ना.ए.सो. संस्थेचे उपाध्यक्ष सी.ए.डॉ. प्रविण पाटील तसेच ना.ए.सो. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री नौनिहाल सिंह जाहंगीरदार तसेच कस्तुरबा मा से के आयसीटीसी समुपदेशक माधव वायवळे उपस्थित राहुन रक्तदाना बद्दल जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. व लेब टेक्निशियन माधव आलापुरे यांनी ऐच्छिक रक्तदाते व इच्छुक विद्यार्थी यांची एच आय व्ही तपासणी केली.
महाविद्यालयाचा दरवर्षी उत्कृष्ट सहकार्य मिळत असल्यामुळे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा पतपेढी तर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, उपप्राचार्य प्रा. ई. एम. खिल्लारे, प्रा. एस . एफ. गोरे, डॉ. व्ही. बी. चव्हाण, प्रा. कपील धुतमल, प्रा. सीमा पांडे, रंजन राठोड यांची विशेष उपस्थिती होती. उपप्राचार्य व रा.से.यो.चे कार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ. अरुणा राजेंद्र शुक्ल व रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. ए. मुनेश्वर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन बहीरे ने केले तर प्रो. डॉ. अरुणा राजेंद्र शुक्ल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले. शिबिर आयोजनासाठी आशितोष घाटोळे, पवन बहिरे, करण ठाकूर, पल्लवी गिरबीडे, नीलिमा पंडित, दिव्या ठाकरे, विशाखा खिल्लारे, सत्यम सूर्यवंशी, प्रीती कुलकर्णी, दिलीप कापुरे शंकर पतंगे खलील बेग यांनी विशेष परिश्रम घेतले. लॅब टेक्निशियन प्रविण चव्हाण, बळीराम रेपाळे, युवराज चव्हाण, विशाल घोडगे, रोशनी नागरे, श्रद्धा कदम, रक्तपेढीचा संच उपस्थित होता त्यांचे महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आले. या शिबिरासाठी विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

COMMENTS