नांदेड (जिमाका) दि. 4 :- सन 2022-23 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरू क...
नांदेड (जिमाका) दि. 4 :- सन 2022-23 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर 15 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नांदेड यांनी केले आहे.
सन 2022-23 यावर्षी रिनिवल व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असेही आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नांदेड यांनी केले आहे.
000000
COMMENTS