नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' परिसरातील रहिवासी तथा आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. एल. अर्थातच काळब...
नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' परिसरातील रहिवासी तथा आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. एल. अर्थातच काळबा लक्ष्मणराव ढाकणीकर (वय-६५ वर्षे) यांचे १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान, विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात निधन झाले.
कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, स्वाभिमानी नेतृत्व व मातंग समाजाचे भूषण दिवंगत के. एल. तथा काळबा ढाकणीकर यांच्या पार्थिव देहावर रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता नवीन नांदेडातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS