' नांदेड:(दि.१ ऑक्टोबर २०२२) सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प कार्यालय, किनवट, सहाय्यक आयुक्त, कौशल...
'
नांदेड:(दि.१ ऑक्टोबर २०२२)
सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प कार्यालय, किनवट, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, नांदेड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड, टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, हुसूर व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या वतीने दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी फक्त महिलांकरिता आयोजित रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला.
नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके नांदेड, किनवट, माहूर, भोकर, हदगाव इत्यादी व हिंगोली, वाशिम आणि परभणी जिल्ह्यातील एकूण ५५०० च्या वर इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मिळाव्यात लेखी परीक्षा व मुलाखत दिली. त्यापैकी १४५० उमेदवारांना टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीद्वारे रोजगार प्राप्त झालेला आहे. यशवंत महाविद्यालयातील ६३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; त्यापैकी जवळपास २५० उमेदवारांची निवड झालेली आहे.
रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प, किनवट श्री कीर्तीकरण पुजार यांनी रोजगारासाठी आलेल्या मुलींना मार्गदर्शन केले व शिबिर घेण्याची आवश्यकता स्पष्ट केली. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड डॉ.तेजस माळवदकर व सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास विभाग, नांदेड रेणुका तम्मलवार यांच्या अथक प्रयत्नाने हे शिबिर यशस्वी झाले. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे निवड अधिकारी ऐश्वर्या लांडे यांच्या विशेष प्रयत्नाने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरळीत पार पडली.
आजपर्यंत झालेल्या भरतीपैकी ही सर्वात मोठी भरती असून तरुणांना रोजगार प्राप्त झाल्याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ.साहेब शिंदे, समन्वयक डॉ.व्ही.सी. बोरकर, डॉ. संजय ननवरे, डॉ.विजय भोसले, डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. साईनाथ शाहू,डॉ.दिनेश बिच्चेवार, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

COMMENTS