मुंबई दि. १ :कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत काढण्यात येत असलेल्या "भारत जोडो" यात्रेला महाराष्ट्र इंटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.भारत जोडो आंदोलनात भारतीय संविधानाचे रक्षण करा, लोकशाही मजबूत करा,सर्वधर्मसमभाव,ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई वाढ,आर्थिक विषमता आदी प्रश्नावर जनमत जागृत करण्यासाठी "भारत जोडो"यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर यात्रा मुंबईत २ ऑक्टोबर रोजी,गांधी जयंतीदिनी दुपारी ३ वाजता ऑगस्ट क्रांतीमैदान येथे येणार आहे.तेथे सर्व इंटक कामगार कार्यकर्त्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे. सर्वश्री निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण आदी पदाधिकारी ऑगस्ट क्रांती मैदानावरील यात्रेत कार्यर्कत्यांना सहभागी करून घेण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
***


COMMENTS