मुखेड / प्रतिनिधी मंत्रालयाचा प्रवेशद्वारावर असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या दहा कलमी तैलचित्राचे संदेश तात्काळ परत लावण्यात...
मुखेड / प्रतिनिधी
मंत्रालयाचा प्रवेशद्वारावर असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या दहा कलमी तैलचित्राचे संदेश तात्काळ परत लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मुखेड येथील महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने दि.२९ रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींना पाठवले.
निवेदनात म्हटले की, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयाचा प्रवेशद्वारावर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या दहा कलमी तैलचित्राचे संदेश लावण्यात आले होते. मात्र सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच मंत्रालयाचा प्रवेशद्वारावर असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या दहा कलमी तैलचित्राचे संदेश हटवल्याने राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रेमींनी सरकारवर तीव्र संताप व्यक्त करत मुखेड येथील महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग टेंभूर्णीकर, जिल्हाध्यक्ष गंगाधर मावले तळणीकर, जिल्हा सचिव दत्ता येवले सलगरकर, तालुकाध्यक्ष मारोती विभुते, सल्लागार बालाजी मामीलवाड, शहराध्यक्ष चंद्रकांत डोंगरे, लक्ष्मीकांत मुखेडकर, नागेश मामीलवाड, राजेश विभुते, तुकाराम पुसलवाड, शिवराज भुरे सह युवासैनिक योगेश मामीलवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS