देशाचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी कार्यक्षम युवक आवश्यक डॉ. मल्लिकार्जुन करजगी प्रतिभा निकेतन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्बोधन शिबिर संपन्न

  नांदेड ०२/१०/२०२२ गरुडा   प्रमाणे  उंच  झेप  घेऊन आपले  लक्ष  साध्य युवक  करणारे   युवक   देशाचे भवितव्य उज्वल  करू शकतात. असे सक्षम तरुण ...


 

नांदेड ०२/१०/२०२२

गरुडा प्रमाणे उंच झेप घेऊन आपले लक्ष साध्य युवक करणारे युवक देशाचे भवितव्य उज्वल  करू शकतात. असे सक्षम तरुण स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तयार होतात. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेचे आमच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे ब्रीद वाक्य उच्चारत असताना तुम्ही म्हणजे कोण तर माझ्यातला मी सोडला तर आपण सगळे मिळून तुम्ही बनत असतो आणि म्हणून प्रत्येक स्वयंसेवकांनी इतरांसाठी झगडणे, इतरांसाठी योगदान देणे म्हणजेचआपल्या सर्वांसाठी देण्यासारखे आहे हे लक्षात घ्यावे. देशाचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी कार्यक्षम युवक आवश्यक आहेत असे प्रतिपादन डॉ. मल्लिकार्जुन करजगी संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी केले. ते रासेयोच्या उद्घाटन शिबिरामध्ये बोलत होते.

 

प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड़ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांना रासेयोचे ध्येय, स्वरुप, कार्य प्रणाली ईत्यादी ची माहिती देण्याच्या हेतूने उद्बोधन शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्बोधन शिबिराचे उद्घाटन डॉ. मल्लिकार्जुन करजगी, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते तर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाची उप-प्राचार्य डॉ. दिलीप स्वामी, प्रा. अशोक गेडाम, डॉ. मारोती लुटे, प्रा. बालाजी यशवंतकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत कु. लता पांचाळ व प्रियंका पाटील यांनी सुमधुर गीताने केले. प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीमंत राऊत यांनी प्रस्ताविकातुन प्रतिभा निकेतन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात पाठीमागची भूमिका व करोना महामारीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा गौरव देखील करण्यात आला. 24 सप्टेंबर रासेयो दिन निमित्त आयोजित सामान्यज्ञान व आज़ादी का अमृत महोत्सव या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना ‘राष्ट्रिय सेवा योजना हे महाविद्यालयीन तरुणाईला दिशा देण्याचे अत्यंत महत्वाचे माध्यम आहे. ही केवळ शासनाची योजना नसून देश घडवणारी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी डॉ. करजगी यांनी वेगवेगळ्या चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलेअध्यक्ष समारोप करत असताना डॉ. दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञान घेण्यास सोबतच श्रमाची प्रतिष्ठा निर्माण करण्यावर भर द्यावा त्या सोबतच सामाजिक कार्य मध्ये पुढाकार घेऊन इतरांच्या उपयोगी पडावे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारोती लुटे यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बालाजी यशवंतकर यांनी मानलेतर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तनुश्री कांबळेनागेंद्र सरपेसाईप्रसाद मोरलवारशीतल कोकरेनयन कांबळेअवंतिका लुलेमीनाक्षी यादव, सुशांत सोनकांबळेबलजित कौर सिंधूशैलेश कोकरे, श्यामराव भालेरावमाधव घोरबांड व एकनाथ गच्चे  आदींनी परिश्रम घेतले. 

Attachments area

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group