विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई संचालित समर्थ ग्रंथालयाच्या वतीने भारतरत्न, मिसाईल मॅन व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त 15 ऑक्टोबर 2022 रोजी सायं. 6.30 वाजता "वाचन प्रेरणा दिन" तसेच "विद्यार्थी दिन" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात 55 वाचकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार, गीत, बोधपट, परिचय, स्वागत करून झाली. या प्रसंगी निवडक दिवाळी अंक व विवेकानंद व्याख्यानमालेच्या पासेस चे लोकार्पण पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी
वेलिंगकर इन्स्टिटय़ूटचे आईटी प्रमुख श्री अशोक आसवले व प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक श्री जयेश प्रेमजी सावला उपस्थित होते. तसेच त्यांचे अनमोल मार्गदर्शन श्रोत्यांना लाभले. वक्त्यांनी वाचनाचे महत्त्व, डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन परिचय करून दिला तसेच ग्रंथालयाच्या कामकाजाचे महत्व सांगितले. संस्थेचे मंडळ प्रमुख सचिन हराळे यांनी प्रास्ताविक तर ग्रंथालय प्रमुख डॉ. रमेश यादव यांनी परिचय, स्वागत, आभार व कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन केले.


COMMENTS