नांदेड:(दि.४ ऑक्टोबर २०२२) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सूक्ष्मजीवशा...
नांदेड:(दि.४ ऑक्टोबर २०२२)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे यांच्यातर्फे रक्तगट निदान शिबिराचे दिनांक 3 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये बी.ए., बी.कॉम. आणि बी.एससी.च्या सुमारे ३६० विद्यार्थ्यांनी सकाळी ११ ते २ या वेळेत आपले रक्तगट तपासून घेतले.
सदरील शिबिर विभाग प्रमुख डॉ.एस.एम.मोरे,डॉ.सौ.अर्चना गिरडे, डॉ.एस.बी.मोरे,प्रा.शिवराज पाटील, प्रा.कुमारी साक्षीकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकेतर कर्मचारी रमेश खांदेजोड, डी.जे.पिठलेवाड,मधुकर जाधव यांच्या उपस्थितीत तसेच सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर व पदवी विद्यार्थी यांच्या सहकार्याने पार पडला.

COMMENTS