सेलू : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने बुधवार ( दि. १९ ) रोजी तालुक्यातील आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयात सायंकाळी पाच वाजता अक्षर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यानमालेचे दुसरे वर्षे असून या वर्षी ' आता उठवू सारे रान ' या विषयावर किसानपुत्र आंदोलन, महाराष्ट्र राज्याचे प्रणेते अमर हबीब हे पुष्प गुंफतील. या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त सत्कार होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, गटविकास अधिकारी गजानन वाघमारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अक्षर व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी सर्जेराव लहाने, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, सुरेश हिवाळे,शरद ठाकर, डॉ.अशोक पाठक, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, सुभाष मोहकरे, रमेश नखाते, एकनाथ जाधव, डॉ.सतीश मगर, सदस्य परिश्रम घेत आहेत.


COMMENTS