मुदखेड (संतोष दर्शनवाड) मुदखेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा महोत्सवानिमित्त रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ये...
मुदखेड (संतोष दर्शनवाड)
मुदखेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा महोत्सवानिमित्त रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन येथील मोंढा मैदानावर 5 ऑक्टोबर रोजी रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे .
या निमित्ताने श्री गणेश उत्सव सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश मंडळाला पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे .माजी नगरसेवक कैलास गोडसे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन मित्र मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे. दसरा महोत्सवात श्री कालेजी देवी मंदिर येथून श्री देवीची पालखी सायंकाळी चार वाजता निघेल व रामपूर येथील मारुती मंदिराजवळ सिमोउल्लंघन होइल.
कोरोना काळानंतरचा गणेश उत्सव कार्यक्रमात विविध मंडळाकडून करण्यात आलेल्या उपक्रमास माजी नगरसेवक कैलास गोडसे, माजी नगरसेवक गंगाधर पाटील डांगे, माजी नगरसेवक संजय आवलवार , डॉ.संदीप पचलिंग, रामसिंग चव्हाण ,सचिन चंद्रे, यांच्या कडून विविध पारितोषिक देण्याची घोषणा केली होती .राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक खंडेराव वड्डे , मार्केट कमिटीचे संचालक संदीप पाटील गाडे , ज्येष्ठ पत्रकार मनोज कमटे ,. जितेंद्र शर्मा , नितीन गोडसे , यांच्या सह समितीने निरीक्षण करून पारितोषिक साठी नामांकन दिले होते .यामध्ये क्रमांक एक पासून सहा पर्यंत पात्र ठरलेल्या गणेश मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना रावण दहन कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते सत्कार व पारितोषिक देण्याचा कार्यक्रमही दरवर्षीप्रमाणे आयोजित केला आहे . सांस्कृतिक प्रधान मनोरंजन कार्यक्रमात रावण दहन कसे होते याचा आनंद लहान थोरापासून सुद्धा हा कार्यक्रम विविध उपक्रमाने साजरा होत आहे.
विशेष म्हणजे मुदखेड शहर व तालुक्यातील भारतीय सैनिक दलातील केंद्रीय राखीव पोलीस बल सीमा सुरक्षा दल सेवानिवृत्त माजी सैनिकांचा सत्कार मोंढा मैदानावरील व्यासपीठावर होणार आहे. अशी माहिती माजी नगरसेवक कैलास गोडसे यांनी दिली
COMMENTS