गिरणी कामगारांना घरे मिळवून देणारच

  मुंबई, ता. ५ : मुंबईतील गिरणी कामगारांना आतापर्यंत ३५ हजार घरे मिळवून देण्यात आली. मुंबईबाहेर गेलेल्या कामगारांना पुन्हा मुंबईत आणण्यात आल...

 

मुंबई, ता. ५ : मुंबईतील गिरणी कामगारांना आतापर्यंत ३५ हजार घरे मिळवून देण्यात आली. मुंबईबाहेर गेलेल्या कामगारांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले. येत्या काळात गिरणी कामगारांना मुंबई आणि परिसरात १ लाख घरे मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला असून घरे मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष व आमदार सचिन अहिर यांनी आज व्यक्त केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ या संघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परळ भोईवाडा येथे असलेल्या मुख्य इमारतीतील महात्मा गांधी सभागृहात आज दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन अहिर होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर हे उपस्थित होते. सोबतच संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कामगार नेते अनिल गणाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी संघटनेची सलग २५ वर्षे प्रतिनिधीत्व केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला....उद्योगाचे खासगीकरणअहिर पुढे म्हणाले की, ‘मुंबई शहरात प्रत्येक कामगाराला आपल्या हक्काचे घर मिळावे, यासाठी आमचा संकल्प आहे. आमचा कामगार मुंबईतल्या टॉवरमध्ये कसा जाईल, हे आम्ही पाहणार आहोत. आम्हाला कामगारांसाठी अनेक योजना राबवायच्या आहेत. एकेकाळी मुंबईत खासगी मिलमालकाकडून गिरण्या घेऊन त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यात आला. आज सरकारी उद्योगांचे खासगीकरण केले जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कामगार संघटनेच्या लोकांनी कोणती मागणी केली पाहिजे आणि कुठपर्यंत थांबले पाहिजे, हे ठरवले पाहिजे.’...कार्यकर्ते घडवण्याचे कामकार्यकर्ते घडवण्याचे काम राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केले. आज कामगारांच्या जीवावर १५० हून अधिक कंपन्यामध्ये संघटना पोहोचली असल्याची माहितीही सचिन अहिर यांनी या वेळी दिली. विजय पाटकर म्हणाले की, ‘जो भारताला जगवत असतो तो कामगार आहे. माझे वडील मिल मजदूर होते. याच सभागृहात माझे अर्धे आयुष्य गेले. मला अभिनेता आणि यश मिळवण्यासाठी कामगारांकडूनच आशीर्वाद मिळाला.’ संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group