नवी मुंबईतील सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानात आज एक ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सानपाडा येथील समाजसेवक व शिवसेनेचे नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी जेष्ठ नागरिकांना नाष्टा दिला. तर समाजसेवक जगन्नाथ जगताप ( उर्फ आबा ) यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना कमळाचे फुल देऊन ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. सिताराम मास्तर उद्यानात झालेल्या ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात नगरसेवक सोमनाथ वासकर, समाजसेवक व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, भाजपचे जगन्नाथ जगताप ( आबा ), शिवसेनेचे शाखाप्रमुख अजय पवार, आर. एस. एस. चे पदाधिकारी अजय मुडपे, शितल चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्राचे पदाधिकारी विठ्ठल गव्हाणे यांनी केले तर आभार रमेश शेट्ये यांनी मानले. याप्रसंगी मराठा विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी विष्णुदास मुखेकर, मारुती विश्वासराव, ज्ञानेश्वर जाधव तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS