नांदेड ः हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम कडवट शिवसैनिक कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
नांदेड ः हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम कडवट शिवसैनिक कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी दसरा मेळाव्यानिमित्त मुंबई येथील बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून दहा हजार शिवसैनिकांनी रवाना होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते तथा खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता. एक) जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, सहसंपर्कप्रमुख गंगाधर बडुरे, जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर, उमेश मुंडे, शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यास अधिक महत्व असून, त्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिकांनी मुंबईच्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहावे. यासाठी मंगळवारी (ता.चार) नांदेडच्या रेल्वे स्थानकावरुन सायंकाळी आठ वाजता १८ डबे असलेली स्पेशल रेल्वे आरक्षित करण्यात आली असून, या स्पेशल रेल्वेस नांदेडसह पूर्णा, परभणी, जालना, ठाणे, दादर येथे थांबा देण्यात आला आहे. तर परतीच्या प्रवास बुधवारी (ता. पाच) सायंकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरुन ही रेल्वे निघणार असून ही रेल्वे दादर स्थानकावर साडेअकरा वाजता निघेल असेही ते म्हणाले.
COMMENTS