प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
नांदेड परिक्षत्राचे कर्तव्यदक्ष विषेश पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांची महाराष्ट्र पोलिस दलात एक कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख आहे. नांदेड परिक्षत्राचा पदभार स्विकारल्यानंतर परिक्षत्रातील चारही जिल्ह्यात अवैध धंदे खपून घेणार नसल्याचा ईशारा त्यांनी अधिकारी यांना दिला होता. हिंगोली जिल्ह्यात काही ठाणेदार यांनी अवैध धंदे चालकांकडे दुर्लक्ष केल्याने अशा ठाणेदारावर डिआजी यांनी कारवाई करून त्यांच्याकडे चुकिला माफी नसल्याचे दाखवून दिले. हिंगोली जिल्हयात पोलिस उपाधिक्षक असताना निसार तांबोळी यांनी गुन्हेगारांना सळो कि पळो करून सोडले होते. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील खाच खळग्यांची चांगलीच माहिती आहे. नांदेड परिक्षत्राचा डिआजी पदाचा पदभार घेतल्यानंतर तांबोळी हे जिल्ह्यातील गुन्हेगारींना आळा बसवणार यात शंकाच नव्हती. आणि त्यांनी परिक्षत्रातील चारही जिल्ह्यात विविध मोहिम राबविल्या. एक वर्षापुर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आखाडा बाळापुर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई केल्यानंतर डिआजी तांबोळी यांनी तत्कालीन ठाणेदारावर तात्काळ कारवाई केली होती. त्यानंतर हिंगोली ग्रामीण चे तत्कालीन ठाणेदार यांच्या अवैध धंद्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर ग्रामीण ठाणेदाराची सुद्धा जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली होती. तरकाही दिवसांपूर्वी वसमत तालुक्यातील हट्टा येथे मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहीती मिळाल्यानंतर डिआजी निसार तांबोळी यांच्या पथकाने सदर जुगार अड्ड्यावर धाड मारून मोठी कारवाई केली होती. ज्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हट्टा ठाणेदारावर डिआजीं कडून काय कारवाई होणार याकडे पोलिस दला सहीत जिल्हा वाशियांचे लक्ष लागले होते आणि अखेर हट्टा चे ठाणेदार गजेंद्र सरोदे यांची उचलबांगडी करीत जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर वसमत शहर चे सपोनी बोराटे यांना हट्टा ठाण्याचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेत पोलिस उपनिरीक्षक असतांना हिंगोली जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणारे शिवसांब घेवारे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यात बदली झाली आहे.या सर्व घडामोडी नंतर हट्टा ठाण्याचा नवीन ठाणेदार कोण होणार ? याकडे जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS